भुसावळ रेल्वे विभागात जागतिक वारसा दिन साजरा


भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागात जागतिक वारसा दिन साजरा करण्यात आला
मागील वर्षा प्रमाणे यंदाही दिनांक 15 एप्रिल ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत भुसावळ विभागात जागतिक वारसा दिन साजरा करण्यात येत असून दिनांक 18.04.24 रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त भुसावळ विभागात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला भुसावळच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रॅली विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयापासून सुरू होऊन भुसावळ रेल्वे स्थानकावरून (उत्तर दिशा) मार्गे रेल्वे स्काऊट मैदानावर समाप्त करण्यात आली.

या रॅलीत सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन), एम.के.मीना, अतिरिक्त अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक), रोहित कुमार राजपूत, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता, सर्व शाखा अधिकारी व कर्मचारी, रेल्वे शाळेचे विद्यार्थी यांच्यासह एकूण 300 कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते हेरिटेज की-चेनचे अनावरण करण्यात आले. भुसावळ विभागात शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रेल्वे हेरिटेज वास्तू व इमारती या थीमवर चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. आणि या विषयावर विद्यार्थ्यांसोबत प्रश्न स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल विभाग आणि वैद्यकीय विभागाचे विशेष सहकार्य लाभले.