भुसावळ – उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त लक्षात घेऊन हडपसर (पुणे) आणि गुवाहाटी दरम्यान १६ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
हडपसर (पुणे) आणि गुवाहाटी साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या)
०५६०९ साप्ताहिक विशेष हडपसर येथून दि. ०९.०५.२०२४ ते २७.०६.२०२४ पर्यंत दर गुरुवारी १०.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०८.१५ वाजता गुवाहाटी येथे पोहोचेल. (०८ फेऱ्या)
०५६१० साप्ताहिक विशेष गुवाहाटी येथून दि. ०६.०५.२०२४ ते २४.०६.२०२४ पर्यंत
दर सोमवारी २०.४० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १८.२० वाजता हडपसर येथे पोहोचेल. (०८ फेऱ्या)
थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्जापूर, पंडित दिन दयाळ उपाध्याय जं. , दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर, बरोंनी, खगरिया,नौगाचिया, कटिहार आणि न्यू जलपाईगुडी
संरचना: १ वातानुकूलित- द्वितीय, ३ वातानुकूलित – तृतीय, १२ शयनयान , २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (१८ डब्बे)
आरक्षण: उन्हाळी विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कावर बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irct.co संकेतस्थळावर सुरु आहे.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


