भुसावळ – मध्य रेल्वे भुसावळ वाणिज्य विभागाद्वारे आर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान प्रवाशी सुविधा वाढविण्यात आल्या. प्रवाशी सेवा सुविधा मध्ये वाढ करण्यात आली आहे. ते पुढीलप्रमाणे –

१) विभागात यात्री तिकीट सुविधा केंद्र हे ११ या स्थानकांवर कार्यान्वित करण्यात आले. ज्यामध्ये नाशिकरोड येथे ०५ सुविधा केंद्र , मालेगाव, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खांडवा, अकोला इ.
२) विभागात स्टेशन तिकीट बुकिंग एजंट १५ या स्थानकांवर कार्यान्वित करण्यात आले. ज्यामध्ये अस्वली, श्री क्षेत्र नागझरी, बिस्वा-ब्रिज, मलकापूर, सावदा, रावेर, जामदा, परधाडे, गायगाव, पारस, बोरगाव, माना, वरणगाव, गलाण आणि नायडोंगरी येथे नियुक्त केले आहेत. .
३) विभागात नांदगाव आणि रावेर स्टेशन येथे जनसाधरण तिकीट बुकिंग सेवक नेमण्यात आले.
४) नाशिकरोड स्टेशन , बुरहानपूर आणि भुसावळ येथील एसी वेटिंग लाउंजचे कंत्राट, ई लिलावाद्वारे देण्यात आले.
५) देवलाली गुड्स शेड – नाशिक गुड्स शेडमधील गर्दी कमी करण्यासाठी देवलाली गुड्स शेड येथे ऑटोमोबाईल लोडिंगसाठी सुरु करण्यात आले. 24 NMGHS चा पहिला रेक लोड करण्यात आला, त्यातून रु 15.62 लाख महसूल प्राप्त झाला.
६) ऑटोमोबाईल लोडिंग नासिक रोड येथून – जून 2023 च्या एकाच महिन्यात 32 रेक आणि रु. 4.71 कोटी महसूल प्राप्त झाला.
७) बोरगाव आणि भुसावळ गुड्स शेडमधून जवळपास एक वर्षाच्या अंतरानंतर कापसाच्या गाठींचे लोडिंग पुन्हा सुरु करण्यात आले. 21 BCN चा एक मिनी रेक बोरगाव ते बनगाव आणि भुसावळ ते मालेरकोटला येथे लोड करण्यात आला
८) कसबे-सुकेणे येथे गुड्स शेड विकास चे कार्य पूर्ण करण्यात आले त्याद्वारे व्यापारी यांना सुविधा प्राप्त झाली.
९) पार्सल कार्यालय भुसावळ, मनमाड गुड्स शेड मलकापूर गुड्स शेड, खांडवा आणि नाशिक रोड, अकोला गुड्स शेड येथे कॅन्टीन सुविधा प्रदान करण्यात आली.
१०) विभागात एटीएम ची सुविधा 13 स्टेशन वर प्रदान करण्यात आली त्याद्वारे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात सुविधा झाली.
११) नांदगाव, पाचोरा आणि बुरहानपूर स्थानकांवरील उद्घोषणा प्रणाली सुरु करण्यात आली.
१२) अंकाई-किल्ला स्टेशन प्रथमच पार्सल वाहतुकीसाठी सुरु करण्यात आले 15 पार्सलयान चा एक रेक मध्ये कांदा दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी लोड करण्यात आला त्याद्वारे रु 15.61 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
१३) चाळीसगाव, मूर्तिजापूर, बोदवड स्थानकांवर नवीन पादचारी पुल सुरु करण्यात आले.
१४) अकोला (1), खांडवा (2) आणि नाशिकरोड (1) स्थानकांवर नवीन एस्केलेटर ची सुविधा सुरु करण्यात आली त्याद्वारे दिव्यांग, वरिष्ठ नागरिक यांची सुविधा झाली.
१५) नाशिक (1) बुरहानपूर (2) आणि बडनेरा (2) स्थानकांवर नवीन लिफ्ट ची सुविधा सुरु करण्यात आली
१६) मनमाड रेल्वे स्थानकावर नवीन प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र ची सुविधा सुरु करण्यात आली.
१७) बडनेरा आणि अकोला स्थानकावर येथे बॅटरीवर चालणारी कारची सुविधा सुरु करण्यात आली.
१८) मनमाड, देवलाली, नांदगाव, लासलगाव, हिसवाहळ आणि पांझन स्थानकावर दिव्यांगजन शौचालये ची सुविधा सुरु करण्यात आली.
ही कामगिरी संपूर्ण टीमचे समर्पण आणि परिश्रम दर्शवते, यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री अजय कुमार यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय सहभाग यामुळे विभागाची प्रशंसनीय कामगिरी झाली, ज्याने एक मानक स्थापित केला. रेल्वे क्षेत्रातील उत्कृष्टतेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


