यावल : यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ यावल-भुसावळ रस्त्यावर यावलकडून भुसावळकडे हरभरा घेवून जाणार्या ट्रॅक्टरची ट्रॉली कलंडली. या अपघातात दोन जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारी तीन वाजता पहेलवान ढाब्याजवळ घडला. जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

रस्त्यावर कलंडली ट्रॉली
यावल-भुसावळ रस्त्यावरील अंजाळे गावाजवळ पहेलवान ढाब्या समोरून बुधवारी यावलकडून भुसावळकडे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉली हरभरा नेत असताना एका वाहनाला ओव्हरटेक करतांना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॉली रस्त्यावरच कलंडली. या अपघातात ट्रॉली मधील दोन मजुर जखमी झाले. दामोदर पाटील (रा.वड्री, ता.यावल) यांचे हे ट्रॅक्टर होते. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलेे. रस्त्यावरील हरभरा इतर वाहनाव्दारे शेतकर्याने हलवला.



