गंगाराम प्लॉट येथील एकाला गावठी कट्टासह अटक ! –

भुसावळ – भुसावळ शहरातील जय श्रीराम चौक, सदानंद डेअरी जवळ गंगाराम प्लॉट रोडवर सार्वजनिक जागी एक इसम गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्याच्या कब्जात गावठी पिस्टल दोन मॅगझीन सह बाळगतांना मिळून आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना बातमीदारा मार्फत गोपनीय माहिती की,जय श्रीराम चौक, सदानंद डेअरी जवळ गंगाराम प्लॉट रोडवर सार्वजनिक जागी (ता.१९) रोजी सायंकाळी ०६.२० वाजेच्या सुमारास इसम नामे मनिष रवींद्र ठाकूर ऊर्फे मिठ्या (वय.२२) राहणार गंगाराम प्लॉट भुसावळ हा कोणीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल (तीस हजार) मॅगझीन सह (एक हजार) रुपयांचे असे घातक हत्यार अग्निशास्त्र ताब्यात बाळगून फिरत असतांना मिळून आला.स्थानिक गुन्हे शाखा जळगांव श्रीकृष्ण देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, गुन्ह्याचा अधिक तपास बाजारपेठ ठाण्याचे हवालदार रमण सुरळकर करीत आहे.