नाहाटा महाविद्यालयात पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा- 2024 संपन्न.


भुसावळ- भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात करीयर समुपदेशक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा- 2024 आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी.एच.ब-हाटे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षाला पाणी देऊन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी. गोस्वामी,मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ.जे.एफ.पाटील, करीयर समुपदेशक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र संचालक डॉ. चंद्रकांत सरोदे, प्रा. डॉ.ममता बेन पाटील, प्रा. डॉ. पी.ए.अहिरे, डॉ.उमेश फेगडे उपस्थित होते. पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदर कार्यशाळा आयोजित केली होती. उपप्राचार्य प्रा. डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी महाविद्यालयीन जीवनातील तीन वर्ष विद्यार्थ्यांनी अभ्यास करून व मेहनत घेऊन विविध स्पर्धा परीक्षा देऊन पास व्हावे व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी.एच. ब-हाटे यांनी विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा अधिकाधिक लाभ घेऊन पोलीस भरती परीक्षेत जास्तीत जास्त संख्येने पास व्हावे असे सांगितले. सदर कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस व्ही. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यशाळेस बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर डॉ. चंद्रकांत सरोदे, अंकगणित प्रा.नेहा महाजन आणि प्रा. प्रणिता राणे, मराठी व्याकरण घटकावर डॉ. पुरुषोत्तम महाजन आणि डॉ. स्वाती महाजन यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचा बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. पुरुषोत्तम महाजन यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. दीनानाथ पाठक, डॉ.सचिन कोलते,डॉ.स्वाती महाजन, डॉ. वंदना महाजन, डॉ. सचिन राजपूत, प्रा. आकाश तायडे, डॉ.नीलिमा पाटील प्रा. संगीता भिरुड, प्रा.गौतम भालेराव, डॉ. अजय क्षिरसागर प्रा. धनश्री बरडे आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.