भुसावळात गावठी पिस्टल कारवाई – एक जण ताब्यात :

भुसावळ – शहरातील पांडुरंग टॉकीज परिसरातील न्यू एरिया वार्ड,इंडिया बॅटरी दुकानासमोर एकास गावठी पिस्टल मॅगझीन सह बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

बाजारपेठ स्टेशनचे पोउप निरी.मंगेश जाधव यांना बातमीदारा मार्फत गोपनीय माहिती मिळाली की,पांडुरंग टॉकीज परिसरातील न्यू एरिया वार्ड,इंडिया बॅटरी दुकानासमोर रोडवर सार्वजनिक जागी (ता.१८) रोजी ११.४५ वाजेच्या सुमारास रणजित किशोर चंडाले राहणार ७२ खोली वाल्मिकी नगर भुसावळ हा गावठी पिस्टल मॅगझीन सह (पंचवीस हजार) रुपयांचे ताब्यात बाळगून फिरत असतांना मिळून आला.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोना.महेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

सदरीची कारवाई पोउपनिरी.मंगेश जाधव, यासीन पिंजारी, महेश चौधरी,समाधान पाटील अशांनी मिळून केली. गुन्ह्याचा अधिक तपास महेश चौधरी करीत आहे.