महाव्यवस्थापक यांनी भुसावळ विभागातील नासिक रोड स्टेशनची केली पाहणी :


भुसावळ –
मध्य रेल्वे महाप्रबंधक आर के यादव यांनी दिनांक १३.०३.२०२४ रोजी भुसावळ विभागातील नासिक रोड स्टेशन येथे निरीक्षण केले. स्टेशन निरीक्षण दरम्यान त्यांनी नासिक रोड स्टेशन येथे सुरु असलेले कार्याचा आढावा घेतला. त्यांनी स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ०२ आणि ०४, आरक्षण कार्यालय, स्टेशन परिसर, रेल कोच रेस्टोरंट, पार्किंग परिसर येथे निरीक्षण केले.
महाव्यवस्थापकांनी नासिक रोड येथे सुरू असलेल्या कार्याची सविस्तर पाहणी केली. त्यांनी प्रवाशांच्या सुविधा, प्रवाशांच्या सोयींचे मूल्यांकन केले आणि स्थानकावरील सुरक्षा आणि सुरक्षा उपायांचा आढावा घेतला. स्थानकात विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या कामांची सविस्तर पाहणी केली. त्यांनी सध्या पुरविण्यात येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधांचाही आढावा घेतला आणि प्रवाशांचा प्रवास अनुभव सुधारण्यासाठी कामे जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या.
या निरीक्षण दरम्यान विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक

रजनीश गोयल , अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन सुनील कुमार सुमन, संबंधित शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.