कोईम्बतूर -भगत की कोठी दरम्यान विशेष ट्रेन सेवा (०४ फेरी)

भुसावळ –
रेल्वे द्वारा प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोईम्बतूर -भगत की कोठी दरम्यान विशेष ट्रेन सेवा सुरु करण्यात येत आहे.
विवरण पुढीलप्रमाणे –
गाडी क्रमांक ०६१८१ कोईम्बतूर -भगत की कोठी विशेष दिनांक १४.०३.२०२४ ते ०४.०४.२०२४ पर्यंत प्रत्येक गुरुवारी कोईम्बतूर येथून ०२.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी भगत की कोठी येथे ११.३० वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक ०६१८२ भगत की कोठी – कोईम्बतूर विशेष दिनांक १७.०३.२०२४ ते ०७.०४.२०२४ पर्यंत प्रत्येक रविवारी भगत की कोठी येथून १९.३० वाजता सुटेल तिसऱ्या दिवशी कोईम्बतूर येथे ०९.३० वाजता पोहचेल.
थांबे – त्रिपुर,इरोड, सालेम, जोलारर्पटी, काटपाडी, रेणूगुंठा, गुटी, धोने, मेहबूबनगर, काचीगुडा, निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, भुसावळ, जळगांव, नंदुरबार, सुरत, बरोडा, अहमदाबाद,भिलदी, मारवार भिनमाल,जालोर, मोकलसार, सम्दरी
संरचना – ७ तृतीय श्रेणी वातानुकूलित इकॉनॉमी, ४ तृतीय श्रेणी वातानुकूलित , १ शयनयान, ४ साधारण कोच, २ गार्ड ब्रेक व्हॅन
या विशेष ट्रेन्सच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.