मुंबई : भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील सर्वाधिक चुरस ठरलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांना तिसर्यांदा पक्षाने संधी दिली आहे तर जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट मात्र कापण्यात आले असून त्यांच्या जागेवर स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे. धुळ्यात अपेक्षेप्रमाणे डॉ.सुभाष भामरे व नंदुरबारात हिना गावीत यांना पुनश्च संधी देण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट कापले जाणार असल्याचे अनेकांनी अंदाज वर्तवले होते मात्र पक्ष श्रेष्ठींकडे खासदार खडसे यांच्याबाबत आलेल्या सकारात्मक अहवालाअंती रक्षा खडसे यांना तिसर्यांदा उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.
तिकीट वाटपात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे यांनाही संधी मिळाली आहे.



