नाहाटा महाविद्यालयात १२ वी फेल या प्रेरणादायी चित्रपटाचे प्रक्षेपण :


भुसावळ – मराठी विभागातर्फे नाहाटा हाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ध्येयवेड्या तरुणांनी बघावा असा १२ वी फेल हा चित्रपट दाखवण्यात आला. मराठी विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या ज्ञान संवर्धनासाठी विविध कार्यकमांचे आयोजन केले जाते, त्यापैकीच १२ वी फेल या चित्रपटाचा उपक्रम सोमवार रोजी राबविण्यात आला, या चित्रपटातून आपण जीवनात हार न मानता शिक्षण घेऊन पुढे गेले पाहिजे, याची प्रेरणा त्यांना मिळाली. पीठगीरणीवर काम करणारा गरीब घरातील मुलगा जिद्द व चिकाटीने अभ्यास करून सनदी अधिकारी होतो हा सर्व कष्टमय प्रवास चित्रपटांत दाखविला आहे.
“टूटे हुए सपनो की कौन सुने सिसकी
अंतर की चीर व्यथा, पलको पर ठि ठकी|हार नही मानूंगा, रार नाही |मानूंगा| यू ही आगे बढता जाऊंगा|” या ओळीतून चित्रपटांतील प्रेरणादायी विचारांची कल्पना येते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी केले. मराठी विभागाअंतर्गत स्पर्धात्मक परीक्षेसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात, विद्यार्थ्यांना या चित्रपटातून प्रेरणा मिळेल, त्यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत घेतली पाहिजे असे आपल्या प्रास्ताविकात मांडले,

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस.व्ही. पाटील, तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच . बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. डी. गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास मराठी विभागातील प्रा डॉ. पुरुषोत्तम महाजन यांनी त्यासाठी विशेष परीश्रम घेतले. तसेच प्रा. डॉ. के. के. अहिरे, प्रा. डॉ. दिनानाथ पाठक, प्रा गौतम भालेराव, प्रा डॉ.स्वाती महाजन प्रा वंदना महाजन यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास प्रा डॉ. स्मीता चौधरी, प्रा. आकाश तायडे, प्रा. हेमंत सावकारे, प्रा. अदनान शेख कार्यक्रमास उपस्थित होते.
चित्रपट बघण्यासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थीनीं चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला.