यावल
यावल तालुक्यातील अकलुद येथे १७ मार्च रोजी रविवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत शिरीषदादा चौधरी माध्यमिक विद्यालयात आदिवासी कोळी समाज वधु वर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा कोळी समाज विकास मंच माध्यमातून आदिवासी कोळी समाजाचा उपवर वधू- वर परीचय मेळावा व युवा महोत्सव २०२४ आ.रमेश पाटील यांच्या अध्यस्थांनी राहणार असून कार्यक्रमाचे उदघाटन मत्री दशरथजी भांडे करणार आहे.
या कार्यक्रमात समाजसेवक शांतारामदादा सोनवणे जळगाव ,जि.प.माजी सभापती प्रभाकर सोनवणे ,जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे , सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी.दिलीप सुर्यवंशी, आदिवासी कोळी समाज समन्वय समीतीचे जितेद्र सपकाळेसर, उद्योगपती रामचंद्र सोनवणे यांच्या प्रेरणातून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात जिल्हाभरातील आदिवासी कोळी समाजातील विविध संघटनेच्या पदाधिकारी ,खाससदार,आमदार ,आजी.माजी जि.प.सदस्यं ,सभापती सह समाज बांधव उपस्थित राहणार आहे. उपवर वधु – वर ,घटस्फोट झालेली वधु- वर सह समाज बाधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य आयोजक नारायण कोळी साकरी,विकास सपकाळे कासवा, बंडु कोळी मांगी,सुभाष सोनवणे दुसखेडा ,डाँ स्वप्निल सोळंके न्हावी,दिलीप कोळी फैजपुर ,भरत कोळी यावल,गोकुळ तायडे मनवेल , नितीन कोळी कठोरा ,चद्रकांत कोळी फैजपुर,शरद तायडे सांगवी,नितीन सोनवणे ,प्रदिप सोनवणे दुसखेडा ,सागर सोनवणे राजोरा,धनराज सपकाळे अंजाळे,राहुल तायडे बामणोद , योगराज सोनवणे दुसखेडा ,खेमचंद कोळी पाडळसा,नितीन सपकाळे अकलुद ,तुसार कोळी कोसगाव,राजु कोळी वनोली, गजानन चिखले आमोदा ,दिपक तायडे अट्रावल,संजय सपकाळे कासवा सह तालुका आदिवासी कोळी समाज बांधव यांनी केले आहे.




