पंतप्रधान यांचे हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न : भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड़ ,धुळे , जळगांव, शेगाव, अकोला, बडनेरा, बुरहानपुर, खंडवा येथे 32 प्रकल्पांचे उद्घाटन :


भुसावळ – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते आज १२ मार्च रोजी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आले . देशभरातील अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित समारंभांमध्ये 85 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण केले तसेच 10 वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा दाखविला. यावेळी पंतप्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना संबोधित केले.
महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या हस्ते एकूण 506 प्रकल्पांचे उद्घाटन होऊन लोकार्पण करण्यात आले. . यापैकी 32 प्रकल्प भुसावळ विभागांतर्गत येतात ज्यात 25 एक स्टेशन-एक उत्पाद स्टॉल, दोन माल गोदामे अकोला आंणि अंकाई किल्ला , बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, मनमाड-जळगाव तिसरी लाईन, एक जन औषधी केंद्र आणि दोन रेल्वे कोच रेस्टॉरंटचा समावेश आहे.
भुसावळ विभागात हा कार्यक्रम नासिक, मनमाड़ ,धुळे , जळगांव, शेगाव, अकोला, बडनेरा, बुरहानपुर आणि खंडवा येथे आयोजन करण्यात आले होते.

याकार्यक्रमास खासदार आणि आमदार, स्वातंत्र्यसैनिक, राज्य प्रशासनाचे अधिकारी, बँक आणि पोस्ट ऑफिसचे अधिकारी आणि शाळकरी मुले, स्वयंसेवी संस्था इत्यादी संबंधित स्थानकांवर कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .
भुसावळ विभागातील या कार्यक्रमाला खंडवा स्टेशन येथे लोकसभा खासदार .ज्ञानेश्वर पाटील, खंडवा , आमदार श्रीमती कंचन मुकेश तनवे , कुंवर विजय शाह कैबिनेट मंत्री मध्य प्रदेश , बडनेरा येथे लोकसभा खासदार श्रीमती नवनीत रवी राणा, आमदार रवि राणा, अकोला येथे आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश मारोती पिंपळे, नासिक येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार येथे उपस्थित होते. 
विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय खंडवा स्टेशन येथे, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन , जळगांव स्टेशन येथे, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम के मीना बडनेरा येथे झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि इतर अधिकारी नेमून दिलेल्या स्टेशन वर उपस्थित होते.

भुसावळ विभागातील प्रकल्पांची थोडक्यात माहिती:
वन स्टेशन वन प्रॉडक्ट (OSOP)
स्थानिक “विश्वकर्मा” म्हणजेच कुंभार, सुतार, शिल्पकार, मोची, शिंपी, विणकर, लोहार आणि स्थानिक कारागीर यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन स्थानिक कार्यक्रमाला प्रोत्साहन देईल जेणेकरून त्यांना व्यापकपणे पोहोचण्यास मदत होईल.
जन औषधी केंद्र मनमाड
सर्वांसाठी दर्जेदार औषधे आणि उपभोग्य वस्तू रेल्वे स्थानकांवर नाममात्र दरात उपलब्ध करून देणे हा भारत सरकारच्या ध्येयाचा एक भाग आहे.
वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, बडनेरा
बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळा मध्य रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर या दोन प्रमुखविभागांच्या माल डेपोंना सेवा देईल ज्यामुळे वॅगनची उपलब्धता वाढेल.
1100 व्यक्तींना प्रत्यक्ष रोजगार आणि 5000 हून अधिक व्यक्तींना विविध आऊटसोर्स उपक्रमांद्वारे अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल.
रेल कोच रेस्टॉरंट (RCR) अकोला आणि नासिक रोड
रेल कोच रेस्टॉरंट (RCR) हा एक अनोखा उपक्रम आहे ज्यामध्ये रेल्वे कोचचे जेवणाच्या सुविधेसाठी रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

या आस्थापनांनी ग्राहकांना आरामदायी आणि संस्मरणीय जेवणाचे वातावरण उपलब्ध करून देताना आरामदायी आसनव्यवस्था आणि थीमॅटिक सजावटीसह रेल्वे प्रवासाचे जुने आकर्षण कायम ठेवले आहे.
मनमाड-जळगाव तिसरी लाईनचा प्रकल्प
मनमाड-जळगाव तिसरी लाईन प्रकल्प हा रेल्वेच्या पायाभूत सुविधांमधील एक मोठा टप्पा आहे.
या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाची एकूण लांबी 160 किमी असून एकूण 75% काम पूर्ण झाले आहे.
प्रकल्पाची एकूण किंमत ₹ 1035.16 कोटी आहे.
याच्या पूर्ततेमुळे व्यस्त मुंबई-भुसावळ मार्गावरील गर्दी कमी होईल आणि गाड्यांची गतिशीलता सुधारेल.
खंडवा – सनवाद मेमू चा शुभारंभ (विशेष ट्रेन)
प्रवाशांच्या सोयीसाठी खंडवा-सनावद दरम्यान नवीन मेमू ट्रेन सुरू करण्यात येत आहे. गाड़ी आठवड्यातून पाच दिवस (बुधवार आणि गुरुवार वगळता) धावेल .