भुसावळ रेल्वे विभागामध्ये दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस हा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त भुसावळ विभागामध्ये महिला दिवस हा सर्व स्टेशन येथे साजरा करण्यात आला.

यानिमित्त भुसावळ स्टेशन येथून खंडवा पर्यंत पार्सल गाडीचे संचलन महिला कर्मचारी लोको पायलट श्रीमती ज्योती सिंग , सहायक लोको पायलट रेखा केरकट्टा , ट्रेन मॅनेजर सरिता माने यांच्या द्वारे करण्यात आले. यावेळी गाडीला मंडळ रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांच्या द्वारे हिरवी झेंडी दाखविण्यात आली. रेल्वे स्कूल भुसावळ येथे मंडळ रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रेल्वे स्कूल चे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी यामध्ये सहभाग घेतला. विभागीय रेल्वे हॉस्पिटल भुसावळ येथे वृक्षारोपण आणि महिलासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
तसेच भुसावळ नियंत्रक कार्यालय मध्ये पहिल्यादाच रेल मदत कक्ष बनविण्यात आले ज्यामध्ये महिला कर्मचारी कार्य करतील या कक्ष चे उदघाटन मंडळ रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांच्या द्वारे करण्यात आले तसेच कार्मिक विभागातील महिला कर्मचारी साठी महिला कक्ष बनविण्यात आले. विभागातील रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशी यांना रोपटे देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. व भुसावळ विभागात ठिकठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले यामध्ये स्टेशन परिसर, रेल्वे कॉलनी, डेपो येथे वृक्षरोपण करण्यात आले एकूण भुसावळ विभागामध्ये १२हजार १६० वृक्ष रोपन करण्यात आले.
दरम्यान भुसावळ येथे कृष्णचंद्र सभागृह मध्ये महिलाकरीता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यावेळी महिला कर्मचारी यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी अप्पर मंडळ रेल प्रबंधक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अप्पर मंडळ रेल प्रबंधक (तांत्रिक) मुकेश कुमार मीना, सर्व शाखाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले होते .


