नुपूर महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध : महाशिवरात्रीला नुपूर अँकॅडमीचा उपक्रम :


भुसावळ – येथे महाशिवरात्री निमित्त नुपूर कथक डान्स अँकॅडमी चां वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी नुपूर महोत्सव चे आयोजन शुक्रवार दि. आठ मार्च रोजी शहरातील खाचणे हॉल येथे करण्यात आले होते. याची सुरुवात डॉ.सौ. छाया चौधरी, किरण फालक, डॉ . व्हि. बी. खाचणे, रमाकांत भालेराव,चारू भालेराव यांचे हस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन झाले. या वेळी प्रास्ताविक करतांना रमाकांत भालेराव यांनी अँकॅडमी च्या कार्याची माहिती दिली. यावेळी स्थानिक युवा चित्रकार चंद्रविर बेहरा याने तयार केलेले चित्र पाहुणे कलाकार श्रीनिवास राजेंद्र यांना देण्यात आले. यावेळी त्याचा तसेच सुरेखा पांडव, मालती श्रीखंडे , डॉ. गिरीश कुलकर्णी, यांचा सत्कार करण्यात आला. सर्व सहभागी कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आले. नंतर प्रत्यक्ष सादरी करणास सुरुवात झाली.यात
आदी योगी नमस्तुभ्यं – शांभवी निनावे,भूमिका भोसले,पूर्वी शर्मा,तेजस्वी पाटील,वैभवी गडे.
तर शिव अनादी हैं – भार्गवी उंबरकर, शानवी चौधरी, शारवी लाहोटी,धनश्री भुरे, नक्षत्रा महाले, सानवी कुंभलकर, माहिता सुरी.यांनी सादर केले.नंतर
डीमिक डिमिक डमरू बाजे
सुनिता दरगड, मीनल पाटील, मधुश्री गायकवाड,भावना कांबळे,अंजली ठाकूर.तर शिव तांडव – नुपूर भालेराव हिने सादर करून रसिकांची दाद मिळवली.नंतर ईश गिरीश – यज्ञां पाटील,गार्गी पुसतकर, मानसी टेकवांणी, प्रियांशी जूनागडे, मोक्षदा तळेले, मानवी पवार यांनी सादर केलं
नंतर शिवस्तुती – चारू भालेराव यांनी सादर केली.नंतर ओम् नमः शिवाय डमरू पाणी या गाण्यावर
मंजू शर्मा,यशस्वी पाटील,जयश्री कनोजिया, पल्लवी महाजन, नम्रता सराफ यांनी नृत्य सादर केलं. यानंतर कथक त्रिताल , परमेलू के प्रकार,परण,चक्रदार परन हे प्रकार
लतिका श्रीखंडे, उर्वशी कोळी,हेमांगी पंडागरे, किंजल बाऱ्हे यांनी सादर केले.यानंतर बेंगळुरू ( कर्नाटक )येथून आलेल्या श्रीनिवासन राजेंद्र यांनी यक्षगान हा नृत्यप्रकार सादर करून रसिकांची मने जिंकली.या नंतर
परमेश्वराय शशी शेखराय या गीतावर
लतिका श्रीखंडे, उर्वशी कोळी यांनी सादरीकरण केले यानंतर सर्व सहभागी विद्यार्थी यांनी एकत्रित शिव शंभू शंभू या गीतावर नृत्य सादर केलं.या वेळी श्रीनिवासन राजेंद्र यांना नृत्यश्री पुरस्कार स्वरूपात शाल श्रीफळ व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी रसिक प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सर्व रसिकांनी भक्तिमय वातावरणात नृत्याचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.तर आभार रमाकांत भालेराव यांनी मानले.राष्ट्रगीत झाल्यावर प्रसाद वितरण करण्यात आले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी झुंझार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी, आशीष सैतवाल, राजेंद्र जावळे, शंभू गोडबोले, शंभू मेहेंदळे, सुरेखा पांडव, मालती श्रीखंडे,प्रकाश फेगडे,ऋतिक ,भावेश फिगडे यांनी परिश्रम घेतले.