भुसावळ – पंडीत प्रदिपजी मिश्रा यांचे प्रेरणेतुन “महाशिवरात्री” व ” जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून या शुभदिना पासुन “निर्माल्य विसर्जन सेवा रथ” येथील सखी श्रावणी बहुउद्देशीय संस्थेतर्फे सुरु करण्यात आला . आपले नदी,तलाव,विहिर स्वच्छ रहावे व पर्यावरणाची कुठलीही हाणी होऊ नये तसेच निर्माल्याची सुद्धा कोणत्याही प्रकारे विटंबना होऊ नये यासाठी निर्माल्य विसर्जन रथाचे उदघाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले .

स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड भागात आयोजित कार्यक्रमास प्रजापिता ब्राम्हकुमारी भुसावळ केंद्राच्या ज्योती दिदी व साकेगाव केंद्राच्या रुखमा दिदी , निसर्ग व पर्यावरण संघटनेचे नाना पाटील सर , यांचे हस्ते वृक्षारोपण करून व निर्माल्य विसर्जन सेवा रथाचे उद्घाटन करण्यात आले .वृक्षारोपण करते वेळी आवळा, बेल, सिताफळ , यासह फुलझाडे लावण्यात आले, निर्माल्य संकलन रथ ही संकल्पना नागरिकांना अतिशय आवडली असून परिसरातील नागरिक व महिलांनी त्वरित उत्स्फूर्तपणे निर्माल्य या रथात आणून दिले .
कार्यक्रम प्रसंगी ज्योती दिदी , रूखमा दिदी , यांचेसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या . संस्थापक अध्यक्षा राजश्री नेवे यांनी प्रास्ताविकात निर्माल्य संकलन व पर्यावरण बाबत सविस्तर माहिती यावेळी दिली . आभार उज्वला बागुल यांनी मानले .
यावेळी राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे जिल्हा संघचालक डाॅ.विजय सोनी , सुरेंद्र पाटील , पत्रकार उज्वला बागुल , सखी श्रावणी महिला संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे , माया चौधरी, अनुराधा टाक, स्मिता माहुरकर, भाग्यश्री नेवे, वंदना झांबरे, कामिनी नेवे, मोहिता चौधरी, खान्देशचे मानद पशुकल्याण अधिकारी गौसेवक रोहित महाले, महंत प्रशांत वैष्णव , चंद्रकांत बागुल , राजु सपकाळे, राजेश करोडपती, उमेश नेवे , मनीषा चौधरी , कोळी , कल्पना चौधरी , वर्मा , चौधरी , चंद्रकला बागुल , यांची हि उपस्थीती होती, यशस्वीतेसाठी उमेश नेवे यांचे विशेष सहकार्य लाभले .





