महिलादिना निमित्त संताजी महिला मंच बोदवडतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व महिलांचे आरोग्य शिबिर

बोदवड – संताजी महिला मंच बोदवड यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आज शनिवार दिनांक ९ रोजी दर वर्षाप्रमाने यावर्षीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

मुक्ताई मंगल भवन , स्टेशन रोड बोदवड. येथे आयोजित या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व महिलांचे आरोग्य शिबिर ( हाडांचा ठीसुळपणा व हिमोग्लोबीन तपासणी) कॅल्शियम व हिमोग्लोबीन गोळ्यांचे वाटप- आरोग्य मार्गदर्शन व आरोग्य तपासणी वेळ दुपारी- 1:00 ते 5:00 तसेच गुणवंतांचा सत्कार समारंभ व – दुपारी 2:30 वाजेला तसेच कतृत्ववान महिलांची वेशभूषा असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे

तरी समाजातील सर्व बांधवांनी सहपरिवार मुली व महिलांसह अवश्य उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक संताजी महिला मंच बोदवड यांनी केले आहे .