मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते बल्लारशाह अशी नवीन अतिजलद साप्ताहिक ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस -बल्लारशाह- लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद साप्ताहिक ट्रेन
ट्रेन क्रमांक 22109 अतिजलद साप्ताहिक दि. १२.३.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी २१.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता बल्लारशाह येथे पोहोचेल.
गाडी क्र. 22110 अतिजलद साप्ताहिक दि. १३.३.२०२४ पासून बल्लारशाह येथून दर बुधवारी १३.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा आणि चंद्रपूर.
संरचना: २१ डब्बे – दोन वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी १ सामान क्यूएन गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.
आरक्षण: ट्रेन क्रमांक 22109/22110 साठी आरक्षण दि. ०९.३.२०२४ पासून सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल.


