भुसावळात महिला दिनानिमित्त महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न : किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साईलीला महिला बचत गटाचा स्तुत्य उपक्रम :


भुसावळ – येथील दिनदयाल नगर वस्तीतील महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर व महिला आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साईलीला महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने व कौस्तुभ पॅथॉलॉजीचे सहकार्याने घेण्यात आला
यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते स्त्री रोग तज्ञ डॉ. वृषाली चौधरी यांनी महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांनी योग्य सकस आहार सोबतच हिरव्या पाल्या भाज्यांचा अधिकाधिक वापर करावा जेणेकरून पुरेसे लोह शरिराला मिळेल.महिलांना होणारे कर्करोग यासंबंधी सकल मार्गदर्शन केले
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्ष, सातत्य, संयम ही त्रिसूत्री आवश्यक आहे महिलांना यशस्वी होण्यासाठी आधी स्वतःत बदल करावा लागेल तसेच कोणताही उद्योग सुरू करताना त्याची सखोल माहिती घेऊन नंतर परिश्रम घेऊन जर सुरू केला तर यश हे नक्कीच मिळते असे शिवम पोहाचे संचालिका सौ‌. सुनिता जोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले तसेच उद्योजक म्हणून या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना कसा संघर्ष करावा लागला हेही त्यांनी उपस्थित असणाऱ्या बचत गटांच्या महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले व यातून महिलांनी नक्की प्रेरणा घ्यावी असं आवाहन केलं
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ विजय पालखे यांनी महिलांनी कणखर व खंबीर व्हावे असे मत व्यक्त केले
किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा ॲड .जास्वंदी भंडारी यांनी प्रास्ताविकात महीला अनेकाविध क्षेत्रात प्रगती करीत आहेत ज्याप्रमाणे शिकलेली महिला नोकरी व्यवसाय करून स्वतःची ओळख निर्माण करते तशीच वेगळी ओळख धुनीभांडी करणाऱ्या महिलांची आहे त्या देखील स्वाभिमानाने मोलमजुरी करतात व कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात म्हणून अशा महिलांचा सन्मान करण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला या भगिनींचा सन्मान संस्थेने केला असे मनोगतात म्हटले
यावेळी 47 महिलांची हिमोग्लोबिन तपासणी कौस्तुभ पॅथॉलॉजीचे रितेश वारके यांच्या सहकार्याने करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रेखा धुपे यांनी तर आभार सौ‌ नेहा यावलकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता ठाकूर, सौ सुनिता सुनिता राणे, सौ. संध्या चौधरी यांचेसह माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांचे सहकार्य लाभले