जळगाव जिल्हातील गोहत्या करणारे कत्तलखाने बंद करा-मानद पशु कल्याण अधिकारी यांची मागणी – उपजिल्हाधिकारी यांना निवेदन :


जळगाव – जळगाव जिल्ह्यात दिवसा ढवळ्या गोहत्या करून जोमाने गोमांस विक्री सुरू आहे ज्या मातेने अमृत दुध पाजले नंदीजी देवांनी शेती सोन्यांनी फुलविले आज त्यांची हत्या करून कसाई शिरजोर होत आहे जिल्ह्यात जळगाव व भुसावळसह बहुतांशी भागात गोमांस पकडले होते तसेच गोपनीय माहितीनुसार यावल शिरसाळ साखळी व काही गावांची माहिती असुन लवकरच फोटो सहित जमा करु असे सांगितले राज्यात गोहत्याबंदी असल्यावर कुठल्याच कायद्याचे पालन न करता बिनधास्तपणे गोहत्या करणारे कसाई गुंड मोकाट फिरत आहे गाईला वाचविण्यासाठी गेलेल्या गोप्रेमी गोसेवक यांना जीवेठार करताय तरी लवकरात लवकर जिल्ह्यातील कत्तलखाने बंद करावे गोहत्या करणाऱ्या कसाईवर व गोमांस विक्री करणाऱ्यावर कठोर शासन करावे गाईला कापल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आता तरी गाईला व गोवंशाला न्याय
द्यावा अशी मागणी मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले यांनी केली आहे याबाबत मांडत जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी यांना
निवेदन देण्यात आले या अगोदर फैजपूर यावल प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे लवकरात लवकर कारवाईचे आदेश देत गोहत्या कायमची बंद करु असे आश्वासन अधिकारी यांनी दिले