प्रा. निलीमा सुभाष पाटील तळेले यांना पी. एच. डी. पदवी प्रदान


भुसावळ :- भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. निलीमा सुभाष पाटील यांनी “सिंथेसिस कॅरेक्टराझेशन अँड एप्लीकेशन ऑफ ऑरगॅनिक सेंसर फॉर सिलेक्टिव्ह अँड सेन्सिटिव्ह सेन्सिंग ऑफ कटायन्स” या विषयावर संशोधन केल्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर्फे पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. सदर संशोधनासाठी त्यांना प्रोफेसर डॉ. आर. बी. ढाके (डी. डी. एन. भोळे महाविद्यालय) यांचे मार्गदर्शन लाभले. त्या फेकरी येथील कै. सुभाष विष्णू पाटील यांची कन्या आणि महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. भुषण प्रल्हाद तळेले यांच्या पत्नी आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा आदींनी कौतुक केले.