भुसावळ –
भुसावळ कला, विज्ञान व पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्याल्यात व्यक्तिमत्त्व विकास समिती व संवाद कौशल्य समिती द्वारे पीपीटी व अडव्हरटायसिंग स्पर्धा आणि प्रिपेरींग इफेक्टिव पीपीटी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे , उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रश्मी शर्मा (चेअरमन, व्यक्तिमत्त्व विकास समिती) यांनी पीपीटी व अडव्हरटायसिंग केले.
अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी मुलांना शुभेच्छा देवून पीपीटी व अडव्हरटायसिंग मधील बारकावे सांगितले.
उद्धाटन कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पीपीटी स्पर्धेत व अडव्हरटायसिंग स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.यात विद्यार्थ्यानी सायबर सिक्युरिटी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स , G 20, मार्केट सेगमेंटेशन अँसिएटी अँन्ड डिप्रेशन इ . विषयावर प्रेझेंटेशन केले .यात
प्रथम क्रमांक खुशबू तडवी (FY B.SC.)
द्वितीय क्रमांक प्रसाद गोसावी (FYBCA)
तृतीय क्रमांक. संकेत वारके(FYBCA)
यांनी पटकावला. तर जाहिराती स्पर्धेत प्रथम क्रमांक – पतंजली ग्रुप
द्वितीय क्रमांक – स्मार्ट वॉच ग्रुप
तृतीय क्रमांक- गोल्डन पेन ग्रुप
यांनी मिळविला.
स्पर्धेनंतर सुरू झालेल्या कार्यशाळेत प्रा. दिपक पाटील यांनी प्रिपेरींग इफेक्टिव पीपीटी (Preparing Effective PPT) या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी सादरीकरण करताना घ्यावयाची प्राथमिक काळजी यावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी भाषा, पेहराव, हावभाव इ. विषयी मार्गदर्शन केले.
तसेच दुसऱ्या सत्रात प्रा.पूनम महाजन यांनी इंनोवेशन इन पीपीटी (Innovation’s In PPT)
या विषयावर मार्गदर्शन केले.त्यात त्यांनी टेक्निकल बाबीवर मार्गदर्शन केले.
या स्पर्धेला परीक्षक म्हणून डॉ. जी. आर. वाणी व प्रा. दिपक पाटील हे लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एकता बजाज यांनी केले. कार्यक्रमाचे आभार .डॉ. किरण वारके
यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमिटी सदस्य डॉ. पी. ए. अहिरे, , डॉ. प्रफुल्ल इंगोले, डॉ. के. पी. पाटील, डॉ. आर. एस.
नाडेकर, डॉ. किरण वारके, प्रा. व्हीं. ए. सोळुंके,डॉ. ममता पाटील, डॉ. एम जे. जाधव, प्रा. संगीता भिरुड, डॉ. विठ्ठल केंद्रे, प्रा. एकता बजाज, प्रा. स्वाती शेळके आदींनी परिश्रम घेतले



