भुसावळ-मुंबई सेंट्रल आणि पुणे-इंदूर दरम्यान विशेष गाड्यांच्या सेवेत वाढ :

भुसावळ – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ-मुंबई सेंट्रल आणि पुणे-इंदूर दरम्यान विशेष गाड्यांच्या सेवेत वाढ केली आहे:

ट्रेन क्रमांक 09051 मुंबई सेंट्रल- भुसावळ त्रि-साप्ताहिक विशेष दि. २७.०२.२०२४ पर्यंत अधिसूचित असलेली ट्रेन आता दि. ३०.०४.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे.

ट्रेन क्रमांक 09052 भुसावळ – मुंबई सेंट्रल त्रि-साप्ताहिक विशेष दि. २८.०२.२०२४ पर्यंत अधिसूचित असलेली ट्रेन आता दि. ०१.०५.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे.

ट्रेन क्रमांक 09324 इंदूर – पुणे साप्ताहिक विशेष दि. २८.०२.२०२४ पर्यंत अधिसूचित असलेली ट्रेन आता दि. २४.०४.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे.

ट्रेन क्रमांक 09323 पुणे – इंदूर साप्ताहिक विशेष दि. 29.02.2024 पर्यंत अधिसूचित असलेली ट्रेन आता दि. 25.04.2024 पर्यंत वाढविण्यात येत आहे.

वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळ, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक 09152 आणि 09323 च्या सर्व विस्तारित फेऱ्यांसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी विशेष सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.