भुसावळ : भुसावळातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या महेशनगर भागात वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी धाड टाकत पर्दाफाश केला असून येथून सहा तरुणींची सुटका करण्यात आली आहे तर एका दाम्पत्यास अटक केली असून संशयीत आरोपीं विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

शहरातील महेश नगर भागात गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाली होती. पोलिसांनी पाळत ठेवून गोपनीयपणे चालणार्या या भागातील वेश्या व्यवसायावर रविवार, 3 मार्च रोजी धाड टाकत सहा तरुणींची सुटका केली तर दाम्पत्याला अटक केली आहे. विशाल शांताराम बर्हाटे व पल्लवी विशाल बर्हाटे (महेश नगर, भुसावळ) अशी अटकेतील दाम्पत्याची नावे असून त्यांच्याविरोधात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
ही कारवाई भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण, एएसआय प्रदीप पाटील, एएसआय शालिनी वलके, हवालदार नंदकिशोर सोनवणे, शिपाई अश्विनी जोगी आदींच्या पथकाने केली.
फोनवरूनच चॅटींग शहरासह तालुक्यातील आंबट शौकीन ग्राहक
भुसावळ शहरासह तालुक्यातील अनेक बडे शौकीन ग्राहक या दाम्पत्याच्या संपर्कात होते शिवाय त्यांचे फोनवर संभाषण व चॅटींग झाल्याचे समजते. पोलीस आता कुणा-कुणावर कारवाई करतात? याकडे लक्ष लागले आहे. या कारवाईमुळे शहरातील आंबट शौकीनांमध्ये खळबळ उडाली आहे


