मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी भुसावळ विभागात केली पाहणी :


भुसावळ दि २९ – मध्य रेल्वे महाप्रबंधक आर के यादव यांनी दिनांक २९.०२.२०२४ रोजी भुसावळ विभागातील शेगांव स्टेशन येथे निरीक्षण केले. स्टेशन निरीक्षण दरम्यान त्यांनी शेगांव स्टेशन येथे अमृत भारत योजने अंतर्गत सुरु असलेले कार्याचा आढावा घेतला. त्यांनी स्टेशन प्लॅटफॉर्म , स्टेशन परिसर , पार्किंग परिसर येथे निरीक्षण केले.
महाव्यवस्थापकांनी शेगांव येथे सुरू असलेल्या कार्याची सविस्तर पाहणी केली. त्यांनी प्रवाशांच्या सुविधा, प्रवाशांच्या सोयींचे मूल्यांकन केले आणि स्थानकावरील सुरक्षा आणि सुरक्षा उपायांचा आढावा घेतला. स्थानकात विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या कामांची सविस्तर पाहणी केली. त्यांनी सध्या पुरविण्यात येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधांचाही आढावा घेतला आणि प्रवाशांचा प्रवास अनुभव सुधारण्यासाठी कामे जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या.
महाव्यवस्थापकांनी शेगांव ते भुसावळ दरम्यान निरीक्षण यान द्वारे निरीक्षण केले आणि कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
भुसावळ येथे स्टेशन निरीक्षण , विधुत लोको शेड, विधुत इंजिन कारखाना येथे निरीक्षण केले आणि कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
या निरीक्षण दरम्यान विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक तांत्रिक मुकेश कुमार मीना, संबंधित शाखेचे अधिकारी आणि कर्मधारी उपस्थित होते.