भुसावळ – भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीची जिल्हा कार्यकारणी नुतन जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे यांनी नुकतीच जाहीर केली आहे.

यात सरचिटणीस पदी अजय जाहांगीदार व सुनील वाणी यांची वर्णी लागली आहे तर उपाध्यक्ष म्हणून मंगल सिंग पाटील, नितीन पाटील, रामभाऊ पाटील, चिटणीस पदी वासुदेव बोंडे, लक्ष्मण पाटील, कैलास महाजन तसेच सदस्य म्हणुन विलास महाजन, नंदू पाटील महेश पाटील, यशवंत चौधरी, कमलाकर चौधरी, भागवत महाजन, गिरीश पाटील, कैलास सोनवणे, अनिल पाटील, विश्वास सोनवणे, प्रकाश चौधरी, जयपाल बोदडे यांची कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डॉ राजेंद्र फडके, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन ,अशोक कांडेलकर, अजय भोळे, हर्षल पाटील, हिराभाऊ चौधरी, डॉ केतकी पाटील, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, परीक्षीत बऱ्हाटे, आतिश झालटे, हरलाल कोळी, वैशाली कुलकर्णी यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


