एन.मुक्टो. संघटनेचे पाच टप्प्यात आंदोलन:

भुसावळ – उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे महाराष्ट्र प्राध्यापक संघटना आणि एन.मुक्टो यांच्या आदेशान्वये महाविद्यालयीन भुसावळ कला विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक संघटनेने आंदोलनाची हाक दिलेली आहे. या संदर्भात आज 12 रोजी महाविद्यालयात स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. ए .डी .गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची सभा संपन्न झाली यावेळी केंद्रीय कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष प्रा. एकनाथ नेहेते उपाध्यक्ष डॉ. एस .पी. झनके डॉ. स्मिता चौधरी डॉ. किरण वारके सचिव डॉ. प्रमोद अहिरे डॉ अनिल हिवाळे डॉ ममताबेन पाटील यासह कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर जनरल सभा घेण्यात आली या दोन्ही सभांमध्ये महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ आणि केंद्रीय कार्यकारिणीने दिलेल्या आदेशान्वये 18 जुलै 2018 च्या यूजीसी आयोगाच्या अधिसूचनेची जशीच्या तशी अंमलबजावणी करावी, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसा एम. फिल धारक प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ तात्काळ द्यावे व त्यांचा छळ थांबवावा, 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत जे प्राध्यापक आलेले आहे त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंत्रालयात प्राध्यापक तक्रार निवारण कक्षाची स्थापना करावी, नवीन प्राध्यापक भरती 100% करावी इत्यादी मागण्यासाठी पाच टप्प्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे .यात 26 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व प्राध्यापक काळी फित लावून काम करतील ,28 फेब्रुवारी 2024 रोजी ईमेल द्वारा उच्च शिक्षण विभागातील सचिव व संचालक यांना निवेदन दिले जाईल ,4 मार्च 2024 रोजी सहसंचालक कार्यालयासमोर मोर्चाचे आयोजन केले जाईल, 27 मार्च 2024 रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर धरणे व आंदोलन कार्यक्रम ,15 एप्रिल 2024 रोजी उच्च शिक्षण विभाग संचालक यांच्या कार्यालयासमोर धरणे कार्यक्रम. यासारखे आंदोलनाचे टप्पे राबवले जाणार असून या सर्व आंदोलनात सर्व सभासद प्राध्यापकांनी शंभर टक्के भाग घेऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन स्थानिक शाखेकडून करण्यात आलेले आहे यावेळी स्थानिक शाखेतील सर्व पदाधिकारी व सर्व सभासद प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते