1
– यंदा म्हणजेच सन २०२४ मध्ये तब्बल ६१ विवाह मुहूर्त असल्याने यंदा ची लग्न सराईत शुभ मंगल धुमधडाक्यात होणार आहे .
गेल्या जानेवारीत ८ मुहूर्त निघून गेले असले तरी अजूनही ५३ मुहूर्त बाकी आहे यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुट्याचे नियोजन करुन मे महिन्यात लग्न मुहुर्त साधणार्याची या वेळी मात्र पंचाईत झाली आहे यंदा च्या मे महिन्यात १ व २ तारीख वगळता मुहुर्त नसल्याने मोठी पंचाईत होणार आहे
यंदा च्या मे महिन्यात हिंदू पंचागा नूसार व विवाह ज्योतिष पंडिता च्या अभ्यासा नूसार मे महिन्यात शुक्राचा अस्त सांगीतला आहे या काळात विवाह व अन्य शुभ कार्य वर्ज्य मानले जाते या काळाला बुडी सुद्धा संबोधले जाते
तरीही २०२४ फेब्रुवारी त १६ ,मार्च मध्ये ८ ,एप्रिल ४ ,जुलै ९ नोव्हेंबर ८ व डिसेंबर ८ असे तब्बल ५३ मुहुर्त असल्याने यंदा शुभ मंगल धुमधडाक्यात होणार आहे
दुसरी कडे मात्र बहुत करुन नौकरदार, शेती वाडी व शहरात राहणार्या वराला मुली प्राधान्य देत असल्याने जगांच्या पोशिंदा असलेल्या तरुण सधन सपन्न शेतकरी युवकांना सुध्दा विवाह ईच्छुक युवती नी व त्याच्या पालकांनी प्राधान्य दिले जावे अशी अपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी विवाह इच्छुकांच्या कुंटुबियांन कडून व्यक्त होत आहे



