अमृत योजना काम लवकर मंजूर व्हावे -शिवसेनेचे पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन : अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार -इशारा :


भुसावळ – अमृत योजनेच्या उर्वरित काम लवकर मंजूर व्हावे यामागणी करीता येथील उबाठा शिवसेनेचया वतीने आज दिनांक ३१ जानेवारी रोजी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी अमृत योजनेला लवकर मंजूरी घेऊन या वर्षात काम पूर्ण करावे. काम पूर्ण न झाल्यास आम्ही शहरात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शिवसेनेतर्फे देण्यात आला .

शहरात पाणी पुरवठ्याची समस्या आताच फेब्रुवारी महिन्यात जाणवते आहे. शहरातील जूनी पाणी पुरवठ्याची पाईप लाईन सतत लिकेज होत असल्याने नागरिकांना योग्य तो नियमित पाणी पुरवठा होत नाही. सध्या १०-१५ दिवसांनी ते ही अनिश्चित पाणी पुरवठा होत आहे. त्या मुळे आता पासूनच भुसावळकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे अजून जानेवारी महिना सुरू आहे पूर्ण उन्हाळा बाकी आहे त्या मुळे आपण तत्काळ पाण्यासंदर्भात उपाय योजना करून उन्हाळ्यातील पाण्याचे संकट टाळावे,तसेच भुसावळ नगर पालिकेच्या जागेवर अनेक कुप नलिका आहे परंतु त्या बंद अवस्थेत पडलेल्या आहे त्या कुप नलिका सुध्धा तत्काळ दुरुस्त कराव्या जेणे करून नागरिकांना पाण्यासाठी त्या कुप नालिकेचा फायदा होईल ,तसेच भुसावळ शहरात अनेक ठिकाणी विहिरी आहेत या विहिरींना सुध्धा पाण्याच्या मोटार लाऊन त्या ठिकाणी सुध्धा आपण जनतेला पाण्याची सुविधा उपलब्ध करू शकतो
तसेच पाण्याच्या टँकर ने सुध्धा भुसावळ कराना पाणी पुरविण्यात यावे

 याआधी सुद्धा अमृत पाणी पुरवठा योजना लवकर सुरू व्हावी म्हणून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र याबाबतीत पुढे कोणतीही गती दिसत नाही. ही योजना या वर्षात पूर्ण झाली नाही तर नागरिकांना लिकेज मुळे पाण्याचे गंभीर संकट उभे राहील. 
  आपण याबाबतीत अमृत योजनेला लवकर मंजूरी घेऊन या वर्षात काम पूर्ण करावे. अन्यथा आम्ही शहरात शिवसेना पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी दिला 

यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे,नगरसेवक मुकेश गुंजाळ,पप्पू बारसे, अँड कैलाश लोखंडे, अँड नरेंद्र लोखंडे,दिलीप सुरवाडे,निलेश महाजन,बबलु बारहाते,युवा सेना जिल्हा प्रमुख सूरज पाटील,बबलु धनगर,शरद जैस्वाल,स्वप्नील सावळे, पिंटू भोई,राकेश खरारे,अरुण साळुंके,महमूद शेख,मनोज पवार,शरद जोहरे,यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते