भुसावळ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष पंडितराव कांबळे यांनी जळगाव जिल्हा सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्षा पदी सौ संगीता राजेंद्र भामरे यांची नियुक्ती केली असून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते संगीता भामरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक आप्पा सोनवणे सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक आप्पा सोनवणे, भुसावळ तालुकाध्यक्ष दिपक पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बापूं सोनवणे , सामाजिक न्याय विभाग जिल्हा संघटक संजय जाधव , सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष निखिल सपकाळे , सामाजिक न्याय विभाग भुसावळच्या तालुका ओ बी सी सेल सरचिटणीस रेखा जाधव जिल्हा सहसंघटक प्रविण आखाळे , उपस्थित होते .

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार संतोष चौधरी व सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अशोक आप्पा सोनवणे यांचेसह रॉ कॉ चे पदाधिकारी , व कार्यकर्ते यांनी संगीता भामरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
दरम्यान यानिवडी बद्दल भारती म्हस्के , अंजुम खान , निरंजना तायडे , जयश्री इंगळे , प्रिया अडकमोल , राजेश्री सुरवाडे , सौ पांडव , यांचेसह उज्वला बागुल , अँड .जास्वंदी भंडारी , अँड तुषार पाटील , अँड रमेश पांडव , अँड भारमल , यांचेसह मित्रपरिवारातर्फे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे


