खंडणी प्रकरणातील तिघा संशयीतांना जामीन मंजूर

भुसावळ (प्रतिनिधी )-
नागपूर येथील प्लॉट विक्रीच्या कारणावरुन येथील भारत गिरणारे यांना ४६ लाखांची खंडणी मागुन बेदम मारहाण केल्या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्‍यात माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांचे बंधू संजय आवटे यांच्यासह अन्य तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी भुर्‍या बारसे रा.वाल्मिकी नगर, किशोर उर्फ सुधाकर टोके रा.गांधीनगर, संजय आवटे यांचे गाडीवरील चालक व अनिल किशोर डागोर रा.वाल्मीक नगर, भुसावळ यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज दि.२६ फेब्रुवारी बुधवार रोजी आरोपींना न्या.मानकर यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची १५ हजाराच्‍या जातमुचलक्‍यावर जामिनावर सुटका करण्यात आली. आरोपींतर्फे अ‍ॅड.चरणजित सिंग व अ‍ॅड.मनीष सेवलानी यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *