भुसावळ (प्रतिनिधी )-
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव तर्फे प्रियंका जगदीश महाजन यांना हिंदी विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांचा संशोधनाचा विषय “सुनीता जैन का काव्य : संवेदना के विविध आयाम ” हा असून मार्गदर्शक नाहाटा महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ.रेखा गाजरे होत्या. प्रियंका महाजन ह्या कोटेचा महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गिरीश कोळी यांच्या पत्नी आहे. डॉ. मधुकर खराटे,नाहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे, कोटेचा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा,ग्रंथालय विभाग यांचे अनमोल सहकार्य लाभले. यशवंत शंकर पाटील (काका) पुष्पा यशवंत पाटील (मावशी) यांचे या पदवीत विशेष सहकार्य लाभले



