भुसावळात श्री निलकंठेश्वर महादेव मंदीर, श्री नगर- अष्टविनायक कॉलनी, भुसावळ येथे अक्षदा कलश पूजन

भुसाबळश्री निलकंठेश्वर महादेव मंदीर, श्री नगर- अष्टविनायक कॉलनी, भुसावळ येथे अक्षदा कलश पूजन
बुधवार, दिनांक 03.01.2024 रोजी दुपारी 3 वा. प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा अंतर्गत आपल्या अयोध्या वस्ती (श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी नीलकंठेश्वर महादेव मंदिर ते विठठल मंदिर पासून वामन कॉलनी ते हुडको कॉलनी हनुमान मंदिर शालीन पार्क गंगेश्वर महादेव मंदिर, अयोध्या नगर श्री राम मंदीर) परिसरात अक्षदा वाटप करण्यात येणार आहे.
वरील परिसरात अक्षदा कलश यात्रेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि महाबली हनुमान यांचा सजीव देखावा या यात्रेत असेल. तरी सर्व राम भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असेआवाहन आयोजकांनी केले आहे

ज्या नागरिकांना कलश यात्रेत सहभागी होणे शक्य नसेल त्यांनी यात्रेच्या मार्गावर आपआपल्या दारी रांगोळी, दिवे अथवा इतर धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करावे.