भुसावळ (प्रतिनिधी )-
स्काऊट आणि गाईड तर्फे सुवर्ण बाण या पुरस्काराने सम्मानित करण्यात आल्याबद्दल भुसावळ विभागात कार्यरत प्रधान तिकीट निरीक्षक सैय्यद फरजाना आबिद आणि स्काऊट जिल्हा संघटक आयुक्त यांना भारत स्काऊट आणि गाईड तर्फे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार खासदार एस.के.जैन, डॉ.के.के. खंडेलवाल यांच्या हस्ते गडपुरी,हरियाणा येथे प्रदान करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल आणि स्काऊट आणि गाईड मधील विशेष योगदानाबद्दल त्यात विद्यार्थ्यांना राष्ट्रपती पुरस्कारासाठी तयार करणे, गरीब विद्यार्थ्यांना मदत, वॅक्स प्रोग्राम साठीच्या कार्यात मोठे योगदान आहे.
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता,भारत स्काऊट आणि गाईडचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा,भारत स्काऊट आणि गाईडचे जिल्हा आयुक्त तथा वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के.शर्मा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.



