भुसावळ (प्रतिनिधी )-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती आनंदाने व उत्साहात व साजरी करण्याकरीता रीपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंती अध्यक्षपदी योगेश देविदास तायडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष गणेश (भुरा) सपकाळे, सचिव संदीप (माया) सपकाळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी नुतन समिती अध्यक्ष तायडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या129 व्या जयंती निमित्त संपुर्ण भुसावळ शहर निळेमय करण्यात येईल आणि विविध सांस्कृतिक व प्रबोधत्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, अशी घोषणा केली .बैठकिस रीपाइं आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, पीआरपीचे महामंत्री व जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, काँग्रेसचे भुसावळ शहराध्यक्ष रवींद्र निकम, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मोहन निकम, भुसावळ नगरपालिका विरोधी गटनेते उल्हास पगारे, आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र लक्ष्मण जाधव, बाळा मोरे, बाळा सोनवणे, गिरीष तायडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश यशोदे, नगरसेवक राज खरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे, राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, नगरसेवक रवी सपकाळे, बाळु सोनवणे, प्रकाश सोनवणे, विश्वास खरात, पप्पू सुरडकर, प्रवीण आखाडे, संगीत खरे, दीपक दीपके, संतोष साळवे, दिनेश इखारे, उल्हास खरात, सुमित पाटील, गणेश काळे, अक्षय सोनवणे, हरीष भालेराव, संतोष खुपसे, हर्षल साळुंखे, शरद गवळी, संदीप खंडेराव, भावेश भालेराव तसेच इतर पदाधिकारी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मुन्ना सोनवणे यांनी मानले.



