तेलगंणा येथील जे.जी ॲड सन्स कंपनीचा भारतीय बौद्ध महासभेतर्फे जाहीर निषेध :

भुसावळ – जे.जी ॲड सन्स ही कंपनी तेलगंणा येथे सुरु करण्यात आली आहे या कंपनीने त्यांच्या बिडी च्या पँकेजच्या कागदावर तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा छापलेली दिसुन येत आहे या कंपनीचा तीव्रपणे जाहीर निषेध करतो व ह्या कंपनीच्या बिडीच्या पँकेटवरील नाव व चित्र लवकरात लवकर काढण्यात यावे अशी मागणी तेलंगणा सरकारला करण्यात येणार आहे . या बाबत भारतीय बौद्ध महासभा च्या माध्यमातून जाहीर निषेध नोंदविला जात असून याबाबत संबंधित विभागाला व तेलंगणा सरकार जाहीर निषेध निवेदन देऊन या कंपनीवर धार्मिक भावना दुखविल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वैशाली सरदार , भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस, जळगांव यांनी प्रसिद्धी पत्रकांनव्ये .कळविले