मोटर सायकल चोर भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या जाळ्यात : चोरीची दुचाकी केली हस्तगत

भुसावळ : फिर्यादी सिमा रविंद्र पाटील वय- 32 खाजगी नोकरी रा मामाजी टॉकीज जवळ, जुनी जीन गमाडीया प्रेस, भुसावळ हे ते काम करीत असलेले नवजीवन क्लिनीक, प्रीमीयर हॉटल च्या पाठीमागे कामावर गेले असता सदर ठिकाणी त्यांनी लावलेली त्यांचे मालकीची मोटर सायकल ही कोणातरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती याफिर्याद वरुन भुसावल बाजारपेठ पो स्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सुरु असतांना गोपनिय माहीती मिळाली की, संशयित आरोपी मेघराज चंदु भोई रा गवळी वाडा मामाजी टॉकीज जवळ भुसावळ हा होन्डा एव्हीएटर कंपनीची चोरीची मोटर सायकल घेवुन फीरत आहे. म्हणुन सदर संशयीत आरोपीतास शोधुन ताब्यात घेतले भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांनी एक पथक तयार करुन सदर आरोपीताचा शोध घेणे कामी रवाना केले असता संशईत आरोपी मेघराज चंदु भोई मामाजी टॉकीज जवळ भुसावळ हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यातील गेला माल 1) 10,000/ रु कीं ची हॅन्डा एव्हीएटर काळ्या रंगाची मोटर सायकल क्रं एम एच 19 बिएच 0898 ही त्याने त्याचे साथीदारा माफर्त चोरी केली आहे. सदर ची मोटर सायकल ही दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आली असुन गुन्ह्याचे पुढील चौकशी कामी अटक करण्यात आली आहे. सदर ची कारवाई पोलिस अधिक्षक एम. राजकुमार अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलिस अधि. क्रीष्णांत पिंगळे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पो स्टे चे गुन्हे शोध पथकातील सपोनि श्री हरीष भोये, पो. उ नि मंगेश जाधव, पो हे कॉ रमण सुरळकर, पो हे कॉ उमाकांत पाटील, पो हे कॉ निलेश चौधरी, पो हे कॉ समाधान पाटील, पो कॉ प्रशांत परदेशी, पो कॉ योगेश माळी, पोकों अगर अढाळे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो हे कॉ रमण सुरळकर करीत आहे.