j
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्या प्रयत्नांमुळे विभागातील लासलगाव स्थानक येथून फतुआ स्थानकासाठी पार्सल गाडी मध्ये कांदा भरण्याचे कार्य आज 15.12.2023 पासून सुरू झाले आहे.
एकूण 15 पार्सल यान मध्ये लोडिंगचे कार्य सुरू आहे. या पार्सल गाडी मध्ये एकूण 345 टन कांदा भरण्यात आला आहे.
यासोबतच भुसावळ विभागातील अंकाई किल्ला स्टेशन पार्सल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. अंकाई किल्ला स्थानकात पार्सल वाहतूक सुविधा सुरू झाल्यामुळे शेतकरी, व्यापारी, लोडर, बाजार समित्यांना फायदा होणार असून ते या स्थानकावरून आपला माल वाहतुकीसाठी पाठवू शकतील.




