अहिल्यादेवी कन्या विद्यालय शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न !!

भुसावळ
येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ येथे शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा दिनांक 14 डिसेंबर ते 15 डिसेंबर अशा दोन दिवशीय आयोजित करण्यात आल्या होत्या दिनांक 14 रोजी राष्ट्रीय खेळाडू व कबड्डी पंच म्हणून असलेली नम्रता गुरव यांच्या हस्ते शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी पर्यवेक्षक संजीव पाटील क्रीडा प्रमुख वंदना ठोके अजय डोळे सह सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते .
जिद्द आणि चिकाटी असली तर आपण कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकतो असे यावेळी उद्घाटक नम्रता गुरव यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले .या शालेय क्रीडा स्पर्धेत खो-खो कबड्डी रस्सीखेच संगीत खुर्ची दोरीवरील उड्या भालाफेक गोळा फेक अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कबड्डी रस्सीखेच संगीत खुर्ची या स्पर्धा अतिशय चुरशीच्या झाल्या . गेले दोन दिवस शालेय परिसर हा विविध क्रीडांनी क्रीडा मय झालेला होता .
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या क्रीडा शिक्षकांसह शाळेतील सर्व शिक्षकांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले