भुसावळात अनोखा निकाह : मंगनीचा कार्यक्रम सुरू असतांना लावला निकाह :

भुसावळ- येथील मा नगरसेवक साबीर शेख यांच्या मुलाचे सलमान खानची भुसावळ येथील मणियार मंगल कार्यालयात मंगनी म्हणजे मुलीला मागणी चा कार्यक्रम सुरू असताना जळगावहून मनियार बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख,सैयद चांद , ताहेर शेख व अब्दुल रऊफ त्या कार्यक्रमात पोहोचले व त्यांनी उभे राहून वर आणि वधू च्या पालकांना विनंती केली की एवढा मोठा मंडप, संपूर्ण नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य करणारे व्यक्तिमत्व उपस्थित असताना मगनीचा कार्यक्रम न करता याला नीकाह मध्ये रूपांतरित करा अशी विनंती केली असता भुसावळचे मन्यारबिरादरीचे प्रमुख सलीम चुडीवाला तसेच उपस्थित सर्व पाहुण्यांनी फारुख शेख च्या प्रस्तावाला अनुमोदन दिले व मग सुरू झाली नीकाह ची खरी कवायत कारण पुरुष मंडळी चा होकार मिळाला असता महिलांना सुद्धा विश्वासात घेण्यासाठी फारुक शेख,सलीम चुडीवाला यांनी त्यांचीभेट घेतली असता थोड्या वेळात त्यांनी सुद्धा होकार दिला असता एका तासातच नीकाह लावण्यात आला.

या विवाह सोहळ्यासाठी यांचे सुद्धा सहकार्य मिळाले

वरा तर्फे जाकिर शेख सादिक, हाजी इकबाल सर नसीराबाद , हाजी इकबाल अहमद, साजिद रोशन, सादिक भाई टेलीफोन वाले, यूनुस शेख, ईशा खलील, अहमद शकील, रोशन रफीक रोशन, बिस्मिल्लाह रोशन, नईम अहमद, अकील टी सी , बबलू भाई ऐदलाबाद वाले, गुलाम रोशन सर, लुकमान गार्ड साहब आसिफ गार्ड साहब
अतिकुर रहमान हबीबुर रहमान (वधू चे वडील)
मोहम्मद इफ्तेखार अतिकूर रहमान(वधु चा भाऊ)
शेख रिज़वान शेख जब्बार (वधु चे मेहुणे) शेख जब्बार शेख बाबू ( व्याही) चोपड़ा,
नईममूर रहमान हबीबुर रहमान( वधु चे काका), शेख फारूक अब्दुल सत्तार वधु चे मामा) शेख हनीफ शेख (वधु चे मावसा)
नीकाह होताच वर व त्याचे पालकांचे सर्वांनी स्वागत व वधू तर्फे उपस्थितांना शरबत पाजण्यात आले.