भुसावळ – नवी दिल्ली येथे ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार २०२३ भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रास प्रदान करण्यात आला.
आपल्या अनुभवी आणि कुशल सक्षम नेतृत्वात ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नवनवीन किर्तिमान स्थापन करणारे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले.
संपूर्ण अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि कंत्राटी कामगार यांचे देखील या पुरस्कारात महत्वपूर्ण योगदान असून सर्वांचे
मनःपूर्वक अभिनंदन व
असाच हा प्रगतीचा आलेख आणखी उंचवत जावा अशी सदिच्छा यावेळी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी दिल्या .



