गंधार”तर्फे मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा


जळगाव : येथील गंधार कला मंडळातर्फे दि. 3 डिसेंबर रविवार रोजी मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेत दुपारी साडेबारा वाजता होईल.
सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या या स्पर्धेत लहान गट वय वर्षे 9 ते 15 इयत्ता चौथी ते नववीपर्यंत. तर
पुढील गट खुला असेल. या स्पर्धेत मराठी चित्रपटातील कोणताही गीत प्रकार गाता येईल. चित्रपटाचे नाव व गीताचे बोल सांगावे. गीताचे फक्त दोनच कडवे गाता येतील. बक्षीस पात्र स्पर्धकांनी बक्षीस वितरणाला हजर राहणे गरजेचे आहे. दोन्ही गटातील विजेत्यांना रोख रक्कम स्व.शरद नागराज यांच्या स्मरणार्थ तसेच दोन्ही गटातील प्रथम क्रमांकास स्व. राजाराम देशमुख स्वरगंधार करंडक देण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. नोंदणी मानिनी तपकिरे, सुचेता नेवे, विशाखा देशमुख यांच्याकडे 30 नोव्हेंबरपर्यंतच करावी. असे मंडळातर्फे कळवण्यात येते.