भुसावळ – तालुक्यातील साकेगाव
गावातील रस्ते पेव्हर ब्लॉक व काँक्रीटीकरण साठी 60 लक्ष रु निधीचे विकास कामांचा उद्घाटन सोहळा आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात संपन्न झाला
दि.26 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात भुसावळ मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार संजय सावकारे यांचा ग्रामपंचायत सरपंच कमिटी तर्फे गावाला पर्यटन विकासासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला .
प्रसंगी बोलतांना आ. सावकरे यांनी स्मार्ट व्हिलेज साकेगाव राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत असुन भविष्यात राज्यात प्रथम क्रमांकाची आदर्श गुणवत्ता व पायाभूत सुविधा असलेली ग्रामपंचायत ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करून गावासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन व खत्री त्यांनी दिली
तसेच गावात 70 महिला बचत गट असून महिलांच्या विकासात्मक उपक्रमांसाठी बचत गटांना हॉल बांधून देण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले त्यानंतर वाजत गाजत गावात वार्ड क्रमांक 1 मध्ये भवानी नगर ,वार्ड क्रमांक 2 डांबर गल्ली वार्ड क्रं.4 धनगरवाडा आखर तसेच वार्ड 6 शिंगारबर्डी आदी ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक तसेच स्थानिक महिलांनी आमदार संजय सावकारे यांनी पूजन व करून स्वागत केले .
प्रत्येक वॉर्डात नारळ वाहून फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून आमदार संजय सावकारे यांचे आभार व्यक्त केले
प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील प स सदस्य सुनिल नेहते सदानंद उन्हाळे गोलू पाटील जितू पाटील अनिल पाटील, दिलीपसिंग पाटील सुभाष कोळी माणिक पाटील सुरेश पाटील राजेंद्र पाटील संतोष भोळे दिगंबर पाटिल निवृत्ती बुधो पाटील भूषण पवार दिलीप पटेल दिगंबर फलक आदिंची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद ठाकरे यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच योगिता सोनवणे उपसरपंच सागर सोनवाल माजी आदर्श सरपंच आनंद ठाकरे सन्माननीय सदस्य सचिन सपकाळे अशोक सपकाळे भूषण सिंग राजपूत समाधान कोळी हिम्मत सोनवणे भरत दादा पवार विलास भाऊ ठोके गजानन कोळी ग्रामविकास अधिकारी बी एल पाटील समस्त ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स व गावातील मान्यावरांची उपस्थिती होती



