शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे खडका येथे आयुष्मान भारत हेल्थ कार्डांचे वितरण शिबिर संपन्न

भुसावळ – तालुक्यातील खडका येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आयुष्यमान भारत हेल्थ कार्डाचे वितरण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे रावेर लोकसभा सहसंपर्कप्रमुख विजय परब यांच्या मार्गदर्शना मध्ये आयोजित करण्यात आला

या प्रसंगी भुसावळ तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार दिलीप भोळे यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले खडका गावातील नागरिकांनी व महिलांनी या योजनेतून शिबिरात लाभ घेण्याचे आवाहन दिलीप भोळे यांनी केले योजनेची सुरुवात खडाका गावातून रविवार रोजी करण्यात आली याप्रसंगी तालुका प्रमुख संतोष सोनवणे, विधान सभा क्षेत्र संघटक राजू इंगळे, शेतकरी संघटनेचे प्रमुख अनिल महाजन, दिपक धांडे ,महेश धनगर, पवन भोळे, दीपक सूर्यवंशी, लखनसिंग पाटील ,संजय पाटील , भगवान लढे ,मनोज पवार, दिगंबर महाजन, मनोहर वाणी, घनशाम वारके, अमोल इंगळे, चुडामन भोळे, किरण भोळे, प्रमोद भोळे, कडू सरोदे, राम भोळे, विष्णू परदेशी यांच्या सह शिवसैनिक व गावातील नागरिक उपस्थित होते

शिबिराचे आयोजन साकेगाव कंडारी जिल्हा परिषद गटप्रमुख दीपक सूर्यवंशी व विभाग प्रमुख पवन भोळे सह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले