भुसावळ (प्रतिनिधी )-
शेतकरी कर्ज माफी,महिला अत्याचार तसेच भुसावळ तहसील कार्यालयात रेशनकार्ड साठी होणारी फिरवाफिरव तसेच रेशनकार्ड आॅनलाईन करणे यासह विविध प्रश्नांबाबतीत येथील तालुका आणि शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भुसावळ तहसील कार्यालया जवळ महाआघाडी सरकारच्या विरोधात दि. २५ फेब्रुवारी रोजी, सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे ,खा.रक्षाताई खडसे, आ.संजय सावकारे , नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वात आयोजीत करण्यात आले आहे.
आंदोलनास भाजपा नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती,उपसभापती पंचायत समिती सदस्य,शक्ति केंद्रप्रमुख ,बुथ प्रमुख, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य ,भाजपा कार्यकर्ते व शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
असे आवाहन भुसावळ भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील ,सरचिटणीस दिलीप कोळी,प्रशांत पाटील , शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,सरचिटणीस पवन बुंदेले,अमोल महाजन यांनी केले आहे.



