भुसावळ (प्रतिनिधी )-
पालकमंत्री ना. ग़ुलाबराव पाटील यांचे आदेशान्वये रेल्वे यूनियनचे प्रतिनिधिंनी सोमवार दि.२४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची भेट घेतली.
या भेटीत त्यांनी भुसावळ येथील यावल नाका ते झेडआरटीआय पर्यंतचा रस्ता हा नगरपालिकेकडून रेल्वे ला हस्तांतरित करणे संदर्भात लवकरात लवकर पत्र द्यावे या संदर्भात चर्चा केली.जिल्हाधिकारी यांनी सांगितले की,या रस्त्यासंदर्भात मंत्रालयात फाईल पाठवली आहे. त्वरित कारवाई करत आम्हाला भुसावळ नगरपालिकेचि प्रत व मंत्रालयात पाठवलेल्या प्रतिची १-१ प्रत दिली. आता लवकरात लवकर प्रधान सचिव,सार्वजनिक बांधकाम विभाग,मंत्रालय,मुंबई यांचेकड़े पालकमंत्री ना. ग़ुलाबराव पाटील यांचे सहकार्याने यावल नाका गांधी पुतळा ते झेडआरटीआय पर्यंतचा रस्ता हस्तांतरित करून रेल्वेच्या ताब्यात देण्यात यावा असे पत्र आणावे लागेल.जेणेकरून रेल्वे प्रशासनास रस्ता दुरुस्त करण्यास अडचण येणार नाही व जवळपास सात हजार कामगारांचा आरोग्याचा प्रश्न ही सूटेल,अपघात होणार नाही व सर्व कामगार वेळेवर नोकरीच्या ठिकाणी पोहोचतील.यावेळी ललितकुमार मुथा,प्रदीप भुसारे,प्रीतम टाक,राजकुमार गवळी यांनी निवेदन दिले. यावेळी ललित भारंबे,रूपसिंग पाटील,संजय चौधरी,विशाल सपकाळे,समाधान हीवाळे,महेश राणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



