भुसावळ – माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे कोथळी येथे आपल्या घरी परतण्याचा नियोजित कार्यक्रम निश्चित झालेला आहे. त्यांची प्रकृती आता ठणठणीत बरी झालेली असून ते आता पुन्हा जनसेवेत रुजू होणार आहे. यासाठी जनसामन्यांच्या समस्या जाणून घेण्यासह कार्यकर्ते, स्नेही, नागरिक आणि हिंतचींतकांच्या भेटीगाठीसाठी (उद्या व परवा) दिनांक 19 व 20 नोव्हेंबर 2023 रोजी मुक्ताईनगर येथील खडसे फार्म हाऊस येथे उपस्थित राहणार आहे.
दरम्यान दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रविवार सकाळी ठीक 5.00 वाजता 12322 हावडा एक्स्प्रेस ने मुंबईहून भुसावळ येथे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे आगमन होत आहे.
तरी सर्व पदाधिकारी, हितचिंतक , व नाथाभाऊ प्रेमींनी सकाळी 5.00 वाजता रेल्वे स्थानकावर उपस्थित रहावे . असे कळविण्यात आले आहे .



