भुसावळ : घराची गच्ची धुताना पाणी उडल्याच्या वादातून एकाला शिविगाळ करीत बेदम मारहाण केली. ही घटना शनिवार, काही लोक रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी तिघां विरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जन्नस फ्रान्सीस मार्शल (47, पंधरा बंगला, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, ते शनिवारी दुपारी घराची गच्ची धुत असताना पाणी संशयिताच्या अंगावर उडले व त्या रागातून संशयितांनी शिविगाळ करीत
मारहाण केली. याप्रकरणी निखील मंगल कोदली, राजेश सुरेश चंडाले, विशाल सुरेश चंडाले (सर्व रा.पंधरा बंगला, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार सत्तार शेख करीत आहेत.


