जोगलखेडा येथीलअसंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आमदार सावकारे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश..

साकेगाव – भुसावळ तालुक्यातील जवळखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे समाजसेवक मनोज बियाणी , जिल्हा संघटक परिक्षित बऱ्हाटे नगरसेवक गिरीश महाजन , किरण कोलते , बोधराज चौधरी सुरवाडे दुबे भालचंद्र पाटील सुनिल महाजन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वारके , पुरुषोत्तम नेमाडे ,विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील , युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन सपकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती . तालुक्यातील जोगलखेडा भानखेडा येथील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी सागर पाटील योगेश पाटील स्वप्निल पाटील पवन पाटील प्रशांत पाटील किरण पाटील कृष्णा पाटील राजु पाटील अत्रेय पाटील नितीन पाटील सह असंख्य कार्यकर्त्यांनी भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे . प्रवेश घेतलेल्या
कार्यकर्त्यांचे आ. सावकारे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .