भुसावळ नाहाटा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय ETCIT-2023-24 परिषदेचे आयोजन.

भुसावळ – येथील भुसावळ कला, विद्यान आणि पु. ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे दि. 15-09-2023 शुक्रवार रोजी आयोजन करण्यात आलेले होते. अशा प्रकारची परिषद भुसावळ शहर व परिसरात नवव्यांदा आयोजेत केलेली होती. या परिषदेत सुमारे 50हून अधिक संशोधक प्राध्यपक तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोदंविला होता. यात संगणक व माहिती तंत्रज्ञानातील नवीन विचार प्रवाह या विषयावर सखोल असे विवेचन उपस्थित संशोधकांनी केले. तसेच २० संशोधकांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले.
या परिषदेचे अध्यक्ष मा. विष्णू भाऊ चौधरी (सचिव, ताप्ती एज्युकेशन सोसायटी, भुसावळ) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ,मा. डॉ. मोहन भाऊ फालक (अध्यक्ष, ताप्ती एज्युकेशन सोसायटी, भुसावळ) आणि मा. श्री. संजयकुमारजी नाहाटा (खजिनदार, ताप्ती एज्युकेशन सोसायटी, भुसावळ) यांनी परिषदेसाठी आपल्या शुभेच्छा दिल्या तर प्रमुख उपस्थिती मा. श्री. महेशभाऊ फालक ( चेअरमन, ताप्ती एज्युकेशन सोसायटी, भुसावळ), प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य, माहिती तंत्रज्ञान प्रमुख व परिषदेचे प्रमुख संयोजक प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील , संयोजक व संगणक शास्त्र प्रमुख प्रा. डॉ. जी. आर. वाणी, संयोजक व रिसर्च लॅब समन्वयक प्रा. डॉ. गौरी पाटील आणि आयोजन समिती सचिव प्रा. तुषार पाटील यांची उपस्थिती लाभली. ही परिषद एकूण चार सत्रात संपन्न झाली.
प्रथम सत्रात प्रा. डॉ. राकेश देवरे (संगणक शास्त्र विभाग प्रमुख, एस. एस. व्ही. पी. एस. लेट कर्मवीर डॉ. पी आर. घोगरे सायन्स कॉलेज, धुळे) यांचे बीजभाषण सकाळी ११:०० ते १:०० या वेळेत झाले. बीजभाषणात प्रा. डॉ. राकेश देवरे यांनी “इंट्रॉडक्शन टू ए आय अँड मशीन लर्निग” या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले. सदर परिषदेसाठी
द्वितीय सत्र दुपारी २:०० ते ४:०० या वेळेत संपन्न झाले असून त्यात संशोधकांनी शोधनिबंधांचे सादरीकरण केले.
तृतीय सत्र व परिषदेचे समारोपाचे शेवटचे सत्र दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत संपन्न झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नयना चौधरी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन परिषदेचे सचिव प्रा. तुषार पाटील यांनी केले.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. स्वाती फालक, प्रा. हर्षल पाटील, प्रा. पूनम महाजन, प्रा. अर्चना भालेराव, प्रा. तेजल वारके, प्रा. डिगंबर महाजन, प्रा. मेघा चौधरी,
प्रा. पौर्णिमा पाटील, प्रा. विशाखा कोलते, प्रा. परी तलरेजा, प्रा. जयंत बेंडाळे, प्रा. स्वप्नाली वाघुळदे, प्रा. वैशाली पाटील, प्रा. सायली पाटील, श्री. श्रीकांत चौधरी, श्री. विनय चौधरी, श्री. चुडामण कोल्हे, श्री. रवींद्र पाटील,श्री. लोकेश चौधरी, कु. सायली पाटील, कु. आरती बारी आणि विभागातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.